विठ्ठलराव वरुडे पाटील यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन पुरस्कार प्रदान

कात्रज – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माय माऊली केअर सेंटरचे व लायन्स क्लब ऑफ पुणे,कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


जगभरातील विविध क्षेत्रात लोकहितोपयोगी कामांचा विक्रम करणार्या व्यक्ती आणि संस्थांना  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन ने
सन्मानित करण्यात येते. विठ्ठलराव वरूडे पाटील यांनी माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज यासह विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवा केली करत आहे. हजारो ज्येष्ठ नागरिकांचे डोळ्यांचे ऑपरेशन मोफत केली आहेत याची दखल या संस्थेने घेतली आहे. 


हा पुरस्कार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन,लायन्स क्लब इंटरनॅशनल व व्हीं एन डब्ल्यू सी या संस्थेमार्फत लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन चे संस्थापक ला.राजेशजी अग्रवाल व ला.रवीजी अग्रवाल यांची सर्व टीम व मान्यवरांच्या हस्ते बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर व पुरस्कारार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन यांच्या वतीने करण्यात आले होते.


सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील म्हणाले सामाजिक भान जपणे काळाची गरज ओळखून समाजकार्याचे छोटे रोपटे लावले होते, त्याचा आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याचीच दखल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन व लायन्स क्लब या संघटनेच्या वतीने घेतली. याबद्दल संघटनेचा आभारी आहे.

See also  कॅबिनेट मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत औंध येथे आढावा बैठक