सारथी संस्थेतील प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सारथी संस्थेत घुसले.

पुणे : सारथी संस्थेत प्रलंबित असणाऱ्या अनेक मागण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. दिनांक १३ जून रोजी डॉ.धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सारथी संस्थेच्या कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी पुढील १० दिवसात संचालक मंडळाची बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र अद्याप पर्यंत काकडे यांनी याबद्दल कोणतेही पाऊल उचलले नाही. या विरोधात स्वराज्य पक्ष आक्रमक झाला असून मराठा समाजाच्या युवकांना, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सारथी संस्थेचे कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांनी घेतली आहे.

डॉ.धनंजय जाधव यांच्या सोबत स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष महादेव देवसरकर , उपाध्यक्ष विनोद साबळे , उपाध्यक्ष अप्पासाहेब कुढेकर , प्रशांत पाटणे, केशव गोसावी यांचा सह राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत.

See also  पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते "पुणे डेंटल शो"चे उद्घाटन