PCSB तर्फे XENIA’25 उत्सव संपन्न

पुणे – पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) येथे PCSB (PICT CSI Student Branch) तर्फे XENIA’25 हा दोन दिवसीय तांत्रिक व सांस्कृतिक उत्सव 14 व 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे आणि CSI चे संयोजक डॉ. गिरीश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या उत्सवात नऊ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये टेक आणि नॉन-टेक दोन्ही प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता. HACK-O-WARTS, Coders’ Chamber, आणि Goblet of Debuggers या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कोडिंग, हॅकिंग आणि डिबगिंगचे कौशल्य दाखवले. तसेच, Campus to Corporate या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्यांचा अनुभव मिळाला.

तांत्रिक स्पर्धांव्यतिरिक्त, Tug of War, CricWars, Fandom, Horcrux Hunt आणि Xenia’s Got Latent या स्पर्धांमधून खेळ, करमणूक व कलागुणांना वाव देण्यात आला. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ₹55,000 चे बक्षीस  प्रदान करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी PCSB च्या संपूर्ण कार्यकारी समितीने विशेष परिश्रम घेतले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासह त्यांच्या प्रतिभेला चालना देणारा ठरला. आयोजकांनी सर्व सहभागी आणि विजेत्यांचे अभिनंदन केले व भविष्यात असेच उपक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

See also  विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार - संदीप खर्डेकर