मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर ‘स्वराज्य’ चे सारथी संस्थेतील आंदोलन स्थगित

पुणे : ‘स्वराज्य’ पक्षाच्या वतीने सारथी संस्थेच्या प्रलंबित विषयांसाठी आंदोलन करण्यात आले होते, परंतु १० दिवसांचा वेळ देऊनही कोणताही प्रश्न सोडवू न शकल्यामुळे ‘स्वराज्य’ पक्षाने सारथी संस्थेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता.

जोपर्यंत प्रश्नांवर मार्ग निघणार नाही, तोपर्यंत सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांचे दालन सोडणार नाही, असा पवित्रा स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

अखेरीस रात्री ११ वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांसोबत संवाद साधला. यावेळी ‘सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सारथी चा तारादूत प्रकल्पाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना अशोक काकडे यांना दिल्या, तात्काळ प्रस्ताव सादर न केल्यास काकडेंच्या बदलीच्या प्रस्तावाकडे पहावे लागेल, असे म्हणत तंबी दिली.’

पुढील काही दिवसात प्रकल्प सुरु होईल, यावर आंदोलकांनी आनंद व्यक्त करत, आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनामध्ये स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर पाटील, उपाध्यक्ष विनोद साबळे,उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील, प्रशांत पाटणे, केशव मामा गोसावी, महेश गवळी, डॉ. रुपेश नाठे, प्रा. महादेव तळेकर, उमेश जुनघरे, गणेश सोनवणे, राजू फाले, विजय जरे, विनोद परांडे, राहूल गावडे आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध रुग्णालयात नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण; अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन