बालेवाडी : बालेवाडी येथील कै.बाबुराव गेणुजी बालवडकर मनपा शाळेमध्ये अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या प्रयत्नातून तिर्थ डेव्हलपर्स यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता व संगणकीय प्रशिक्षण करीता ५ लॅपटॅाप व ३ कॅाम्पुटरचे वाटप नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, शशिकांत बालवडकर, योगेश बालवडकर, प्रविण बालवडकर, नितेश पाडाळे, प्रसाद बालवडकर, शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.कल्पना बाबर, मुख्याध्यापिका शोभा घोरपडे, तनुश्री ताजणे, अशोक वाघमारे सर तसेच तिर्थ डेव्हलपर्स चे श्री.कमलेश चौधरी, अशोक टेहाळे व देव कुमार उपस्थित होते.