पुणे : जन संघर्ष समिती पुणे आयोजित डेक्कन जिमखाना गुडलक चौक फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी कर्नल संग्रामसिंह यादव व प्रा. गंगाधर बनबरे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. नागरिकांना १५० किलो बुंदीलाडू चे वाटप करण्यात आले.
यावेळी जन संघर्ष समितीचे चे अध्यक्ष ॲड रवींद्र रणसिंग, संतोष पवार, किशोर सरदेसाई, ॲड संदीप ताम्हणकर, योगेश माळी, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहनदादा जोशी, गोपळ तिवारी, माजी न्या. बी जी कोळसे पाटील, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे, डेक्कन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे मॅडम, एन डी निंबाळकर, भगवानराव डीकलेपाटील, विलास सुरशे, पत्रकार मुकुंद काकडे, नाथा राणे, दत्तात्रय जाधव, सुभाष वारे, प्रा. विकास देशपांडे, शशी धीवार, संदीप बर्वे, नितीन पवार, अनंत सूर्यवंशी, अमोल सावंत, श्री साळुंखे, श्री कोल्हे, सुखदेव सूर्यवंशी, श्रिकुमार काळे, संजय शिरोळे, महेश येवले, विलास पाटील, प्रकाश भारद्वाज, सुनीता नेराळे, अभिजित राजे भोसले, ॲड मोहन वाडेकर, ॲड फय्याज शेख, राजाभावू भनगे, व पुणेकर नागरिक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी व शाळा विद्यालय चे विद्यार्थी हे उत्स्फूरतपणे सहभागी झाले. जयंती कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र शासना तर्फे शाहू महाराज गौरव ग्रंथ पुनर्प्रकाशित करण्यात यावा व छत्रपती शाहू महाराज यांचा डेक्कन परिसर पुणे येथे पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली.