सारथी संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती करण्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, ‘स्वराज्य’ पक्षाची मागणी – डॉ. धनंजय जाधव (स्वराज्य सरचिटणीस)

पुणे : आज छत्रपती शाहू महाराज यांची १५० जयंती (शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती) आहे. सारथी संस्थेने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने भरीव कार्यक्रमांचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रम उपक्रम सारथीने केला नाही. दुसऱ्या बाजुला बार्टी, महाज्योती मात्र महापुरुषांच्या जयंती मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. आम्हाला महापुरुषांच्या तुलना करायच्या नाहीत परंतु हे शासकीय अधिकारी मात्र हलगर्जीपणा करताना दिसतात.

शाहू महाराजांच्या प्रतिमेला साधेपणाने सजावट देखील सारथीने करु नये, पुजनासाठी ठेवलेला फोटोला वाहण्यासाठी फुले असू नयेत. ही संस्थेसाठी शरमेची बाब आहे.
४०० कोटी रुपयांचा निधी मिळणार्‍या सारथी संस्थेला, ज्यांच्या नावे संस्था आहे, त्या राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (१५० व्या) जयंतीला ४०० रुपयांचेही फुले आणणे महागात पडते, हे लाजीरवाणे आहे.

शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्चाविना पडून असताना ज्यांच्या नावे संस्था आहे त्या राजर्षी शाहू महाराजांच्या निमित्ताने अनेक उपक्रम करता आले असते, परंतु संस्थेने तसे काहीच केले नाही.

याबाबत माहिती मिळताच स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सारथी संस्थेत राजर्षी छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेला वाहण्यासाठी फुले आणली तसेच राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून शाहू महाराजांच्या प्रतिमेला सजावट व संस्थेच्या प्रवेशद्वाराला तोरण लावून जयंती उत्सव साजरा केला.सारथी संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती करण्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, ‘स्वराज्य’ पक्षाची मागणी  डॉ. धनंजय जाधव (स्वराज्य सरचिटणीस) यांनी केली आहे.

See also  प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर :जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकासाला प्राधान्य