बालेवाडी : हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरातील बाणेर – बालेवाडी परिसरातील महिलांसाठी शिवसेनेच्या वतीने आज आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ आणि संविधान पूजन कार्यक्रमास आज परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
यावेळी परिसरातील महिलांना हळदी कुंकू बरोबरच आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला “संविधानाचे सामूहिक पूजन” करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिव सहकार सेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब भांडे,उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मुरकुटे, विद्यार्थी सेनेचे राम गायकवाड, रा.श.प.गट कोथरुड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, शिवसेना शहर संघटिका ज्योती चांदेरे, विभाग संघटीका सोनाली जुनवणे,जयश्रीताई मुरकुटे यांच्या हस्ते संविधान पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाळूंगे गावचे युवा सरपंच मयूर भांडे, नेहा मयुर भांडे, ऋतुजा मनोज भांडे यांनी आयोजन केले. तर संगीता बडगुजर, रोहिणी जाधव, पूजा गायकवाड, स्वाती काळे, उमा देवकाते,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अॅड.महेश भांडे,संकेत लोंढे,महेश भांडे,गौरव पाडाळे,अनिकेत बनसोडे,तन्मय ससार ,आदेश भदर्गे,संकेत डेंगळे,करण भांडे,रुतिक भांडे,अभि भांडे यांनी संयोजन केले. उपस्थित महिलांचे स्वागत व सूत्रसंचालन नंदकिशोर लोंढे यांनी केले तर आभार गुलाब तांदळे यांनी मानले.
घर ताज्या बातम्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाणेर-बालेवाडी -सुस महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ...