सशस्त्र सेनेतील जवानांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात रक्त दान शिबिराचे आयोजन

पुणे, दि. २७ : विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सशस्त्र सेनेतील जवान आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी  ९० रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, निलीमा धायगुडे, पूनम मेहता, वैशाली इंदानी, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचे मेजर अनुराग, गट विकास अधिकारी भूषण जोशी, सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त पेढीचे समन्वयक प्रणाल ढेकणे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले. यावेळी मेजर अनुराग यांनी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना प्रमाणपत्र दिले तर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

*विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण*

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना सुवर्ण पिंपळ वृक्ष  बीजाचे वाटप करण्यात आले. श्री. पुणेकर यांनी अजान वृक्षाची माहिती दिली

See also  वैकुंठ परिवाराचा एक पणती पूर्वजांसाठी हा भावस्पर्शी उपक्रम - ना. चंद्रकांतदादा पाटील.