औंध मध्ये गुन्हेगारी शून्यावर आणून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

औंध : पुढील दहा दिवसांमध्ये औंध मध्ये गुन्हेगारी शून्यावर आणून ठेवून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार असल्याचा निश्चय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला. औंध येथील पार्क सोसायटीमधील नागरिकांच्या बैठकीमध्ये संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्ट्र भाजपा प्रवक्ते ॲड डॉ मधुकर मुसळे व नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी औंध मध्ये सकाळी मुख्य रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाचा खून व लागलीच चार दुकान फोड्या च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांना औंध मधील नागरिकांशी संवाद करून भीतीचे वातावरण दूर करण्याची  मागणी केली होती, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण फौज फाट्यासह  एक किलोमीटर रस्त्यावर चालत  पाहणी केली व नागरिकांशी साधला मुक्त संवाद साधला.

दिनांक 13 जून 2024 रोजी औंध मध्ये सकाळी मॉर्निंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा भर रस्त्यावर सहा गुन्हेगारांकडून निर्घृण खून करण्यात आला व त्यानंतर लगेच तीन ते चार दिवसांनी चार दुकान फोडण्यात आली यामुळे नागरिकांच्या जीवेताच्या व मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीती व घबराहट निर्माण झाली यानंतर नागरिकांनी काढलेल्या कॅन्डल मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी दिलेल्या आश्वासन नंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने ॲड डॉ मधुकर मुसळे, नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वाखाली औंध मधील प्रतिष्ठित नागरिक श्री निखिल दोशी श्री अभय पाटील श्रीमती सिंधू भानू श्री सुहास पानसरे इत्यादींसह पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांची भेट घेतली व निवेदन देऊन नागरिकांमधील भीती घालवण्यासाठी औंध  मध्ये प्रत्यक्ष येऊन नागरिकांशी संवाद साधण्याची मागणी केली.
आयुक्ताने याला तात्काळ मान्यता देत लगेचच आज दुपारी औंधमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त  मनोज पाटील, उपायुक्त श्री मनोजकुमार मगर , गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे,  वाहतूक विभागाचे उपायुक्त श्री रोहिदास पवार, एसीपी आरती बनसोडे, सीनियर पी आय शैलेश संखे, गुन्हे शाखा पीआय नांद्रे, एपीआय झरेकर, एपीआय राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेची संपूर्ण टीम यांच्यासह ॲड डॉ मधुकर मुसळे व मा. नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी औंध मधील परिहार चौका जवळील घटनास्थळाला भेट दिली व त्यानंतर एक किलोमीटर पायी चालत परिसराची पाहणी केली व शेवटी क्लेरिऑन पार्क सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये नागरिकांशी मुक्त संवाद साधला ॲड डॉ मधुकर मुसळे यांनी संपूर्ण विषयाची पार्श्वभूमी मांडली व  सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यात थेट संवाद साधून नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी या भेटीचे आयोजन केल्याची माहिती दिली.

See also  पर्यावरण प्रेमींकडून वेताळ टेकडीवरील रस्ता प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी

मिसेस रॉय चौधरी उपस्थित होत्या यावेळी पोलीस आयुक्त यांनी सर्वांच्या वतीने त्यांची माफी मागत पोलीस फास्टट्रॅक वरती तपास करतील तसेच चांगला सरकार वकील मिळण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

यावेळी प्रकाश खोले, मिसेस मोहरील, शितल थोरात, वासुदेव देशपांडे, श्री निखिल दोशी, माधुरी कुलकर्णी, मिसेस मोदी, श्री अभय पाटील, रत्ना जोग, डॉ मनोहर शेट्टीवार, स्नेहल जोशी, डॉ वझरकर याच्यासह अनेक नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.
यावेळी औंध मधील अनेक सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रशांत शीतुत यांनी सर्वांचे आभार मानले.