राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पुणे शहराच्या वतीने बदाम असलेले पाकीट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मंत्रालय पत्त्यावर पोस्ट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पुणे शहराच्या वतीने बदाम असलेले पाकीट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मंत्रालय पत्त्यावर पोस्ट करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थिनीला विविध 662 आणि नव्याने सुरू होत असलेल्या 200 अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असता सदर विद्यार्थीनीस नवीन शैक्षणिक वर्ष 2024 पासून फी भरावी लागणार नाही त्यांचे शुल्क महाराष्ट्र शासन अदा करेल अशी घोषणा केली होती आता 2024 चे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि अजून उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही सदर निर्णयाची अंमलबजावणी लगेचच व्हावी याबाबतचे अनेक विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांची निर्णय स्मरण पत्रे व प्रत्येक पाकिटात एक बदाम यांची पाकिटे आज मा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मंत्रालय पत्त्यावर पोस्ट करण्यात आली.

सौ मृणालिनी मदन वाणी महिलाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पुणे शहर यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकारी यांनी ही पाकीटे पोस्ट पेटी मध्ये टाकत अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

See also  मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग