औंध : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, शेल्टर असोसिएट्स आणि इकॉसन सर्विसेस फाउंडेशन व स्वच्छ संस्था यांच्या संयुक्त विदयमानाने स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियाना अंतर्गत मुळा नदीपात्र महादेव घाट बोपोडी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी अंजनी प्रसाद सिंग जॉईन सेक्रेटरी राष्ट्रीय नदी समर्थन संचालनालय, मा. पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त, मा. संदिप कदम उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा. अरविंद माळी उपआयुक्त परिमंडळ क्र. २, मा. गिरीष दापकेकर महापालिका सहा. आयुक्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली व सहभागाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये श्री. विजय भोईर वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, सौ. धनश्री गुरव कार्यकारी संचालक शेल्टर असोसिएटस, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, आरोग्य निरिक्षक विनायक चोपडे व सर्व सफाई सेवक, स्वच्छ संस्था प्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन महादेव घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच इकोसन सर्व्हिसेस यांच्या वतीने स्व. अंनतराव पवार शाळा बोपोडी याठिकाणी मुलांना स्वच्छता व प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.