खडकी शिक्षण संस्था मध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न!

खडकी : आलेगांवकर प्राथमिक विद्यालय व पी.पी.एम. बाल शिक्षण मंदिर यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, श्री संत विठ्ठल  व रखुमाई या वेशभूषा  विद्यार्थ्यांनी परिधान केले होत्या . तसेच बाकी विद्यार्थी मुलांनी पांढरा शर्ट पायजमा व मुलींनी काष्टा साडी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ व हातामध्ये टाळ  होते. विठ्ठल नामाचा गजर करीत ज्ञानोबा तुकाराम च्या तालामध्ये खडकी शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये पालखी सोहळा साजरा करण्यात आला. आळंदीचे ह भ प सचिन महाराज जाधव यांच्या हस्ते  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे पूजन  करण्यात आले.


आलेगावकर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री माकर  व पीपीएमच्या संचालिका सौ शुभांगी बरेल्लु  यांच्या समवेत ज्ञानोबा तुकाराम, माऊली च्या जयघोषाने पालखीची सुरुवात झाली.


यावेळी जी एम आय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा चपटे, शशिकला माने, अजय गायकवाड,आल्हाट इ.मान्यवर सहभागी झाले होते.चंद्रकांता सोनकांबळे , किशोर मुदनवार , मीना बुरुड व वंदना शिवशरण  यांनी विद्यार्थ्यांना तयार केले. पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी केली व पालखीचा कार्यक्रम यशस्वी केला.

See also  पुण्यातील वाढते अपघात यासाठी पोलीस महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज -खासदार मेधा कुलकर्णी