बाणेर येथे भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी संसद परिषद

बाणेर : भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  विद्यार्थी संसद परिषद सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली .

सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे याकरिता शाळेच्या हेड बॉय, हेड गर्ल तसेच वेगवेगळ्या विभागाचे मंत्री बनविण्यात आले. हाऊस कॅप्टन व्हाईस कॅप्टन तसेच सांस्कृतिक मंत्री शालेय शिस्त मंत्री क्रीडामंत्री यांची सर्व विद्यार्थ्यांनी मतदान करून  निवड केली.  यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  शिवलाल धनकुडे,  ए.पी.आय. बाळासाहेब झरेकर, प्रवीण पाडळे, संस्थेच्या अध्यक्षा सौ सुरेखा धनकुडे, सचिव  विराज धनकुडे, खजिनदार श्री राहुल धनकुडे संस्थेच्या सीईओ सौ सुषमा भोसले, प्राचार्य सौ रेखा काळे सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

See also  " महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ .विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर "