घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या आयांचा आप तर्फे सत्कार

जनवाडी : जनवाडी डिफेन्स कॉलनी हॉलमध्ये गोखलेनागर भागातील धुणीभांडी,स्वयंपाकपाणी करून मोलमजुरी करून  मुला-मुलींना वाढवणाऱ्या ७५ महिलांचा सत्कार आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला.


काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवणाऱ्या घरकामगार महिलांचा सत्कार करताना मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक गीताली वि .मं. म्हणाल्या ,शिक्षणामुळे जगताना मान मिळतो हे लक्षात घेऊन या कष्टकरी महिलांनी आपल्या मुलांना शिकवलं. मुलींना आपल्या पायावर उभा करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे .त्यांनी आपल्या कामाला कमी मानू नये त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे असं म्हणत स्वतःच्या घरात केलेल्या घर कामाला आज काही किंमत नाही याविषयी निषेध व्यक्त केला.घर कामाचे मोल नवरा, बायको आणि मुलं सगळ्यांनी समजून घेऊन एकत्रपणे सर्वांनी घरकाम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.


आम आदमी पार्टी सुद्धा महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी दिल्लीमध्ये आणि पंजाब मध्ये मोफत प्रवास मोफत शिक्षण मोफत आरोग्यसेवा आणि वीज देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीला महिला मतदान करत आहेत असे आप शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले यांनी संगितले.
कष्ट करत,परिस्थितीशी दोन हात करत,चिकाटीने मुलांना घडवले,उत्तम शिक्षण दिले,त्यांचे आयुष्य बदलले, त्यांच्यासाठी या महिला ‘जिजाऊमाता’ बनल्या. त्यांच्या या काबाडकष्टाची, परिश्रमाची आणि जिद्दीची दखल घेत हा सन्मान आम्ही केला असे या वेळेस मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीजा गोडबोले यांनी केले. कार्यक्रम आयोजनामध्ये आप चेशिवराम ठोंबरे ,अमोल मोरे, सतीश यादव, विकास चव्हाण, शंकर थोरात, विकास लोंढे, रहीम खान, निलेश वांजळे, सागर कानगुडे, संदेश सोलकर आदींनी सहभाग घेतला.

See also  शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील  पूनम विशाल विधाते यांचा अनोखा उपक्रम