पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर मा. खासदार शिवाजीराव आढळरावांचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे (शिरुर – हवेलीतील) पिंपळे जगताप, वाजेवाडी या गावांचा समावेश करण्याबाबत पत्र दिले.
जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे यांनी २६ जुन२०२४ रोजी जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यातील २३३ गावांचा “बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” यामधे समावेश केल्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी मा. खासदार शिवाजीराव आढळराव यांची नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघातील पिंपळे जगताप व वाजेवाडी या गावांत बिबट्यांचा वावर असून त्यांपासून नागरिकांच्या व पशुधनाच्या जिवीतास धोका असूनही या गावांचा बिबट प्रवण क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी बिबट हल्ला घटना घडलेली गांव वगळली असल्याचे निदर्शनास आणून लक्ष घालण्याची विनंतीपत्र दिले होते. त्यावेळेस चंदन सोंडेकर यांच्यासोबत अरुण गिरे, मा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद, श्री अनिल काशिद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पुणे , श्री सुभाष जगताप, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे जगताप, श्री नवीन सोनवणे, व्हा. चेअरमन, विकास सोसायटी वाजेवाडी,हे होते.
राष्ट्रवादीचे मा. प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर मा. खासदार आढळरावांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे (शिरुर – हवेलीतील) पिंपळे जगताप, वाजेवाडी या गावांचा समावेश करण्याबाबत पत्र नुकतेच दिले आहे.
























