पुणे : पुणे शहरातून हिंजवडी कडे जाण्यासाठी तसेच कोकणाला जोडणारा महत्त्वाचा असता म्हणून सुसगाव परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे तसेच वाहतूक कोंडी वर उपाययोजना करण्यात याव्या यासाठी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेत लेखी मागणी केली आहे.
पुणे मनपाच्या पश्चिम भागातून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांची राजधानी रायगड इथे जाणारा रस्ता पाषाण- सुस-घोटावडे फाटा ते मुळशी असा आहे. हा रस्ता पुणे हिंजेवाडी IT पार्ककडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे.
पुणे मनपाची हद्द ही गेल्या दोन वर्षांपूर्वी पाषाण पासून पुढे सुस खिंडीपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर पुणे मनपाच्या हद्दीतील रस्त्यावर पुणे मनपाच्या वतीने कोणतेही अधिकृत रस्ता रुंदीकरण केले गेले नसून दिवसेंदिवस वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या उद्भवत आहे. त्याचा सर्वच घटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिंबायोसिस इंटनॅशनल युनिव्हरसिटी, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, लवळे इथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. दररोज अनेक डॉक्टर आणि अँब्युलन्स या ट्रॅफिक मध्ये नाहक अडकत आहेत.तरी जनसामान्यांच्या तीव्र भावनांची लवकरात लवकर दखल घेऊन सदर मुख्य रस्त्यावर पुणे मनपा हद्दी पर्यंत नियोजित DP प्लॅन नुसार रस्ता रुंदीकरण व्हावे आणि ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डन तात्काळ नियुक्त केले जावेत अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.