मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते बाणेर येथे मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे उद्घाटन

बाणेर : सकल मराठा समाज मराठा सहाय्यक समिती कार्यालय बाणेर येथे सुरू करण्यात आले असून मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे. मराठा समाजाने समाजाचे प्रामाणिक काम केले पाहिजे यासाठी मी देखील प्रयत्नशील राहील असे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सांगितले.

बाणेर येथील औंध पाषाण बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी  पुणे शहर परिसरातील मराठा बांधवांनी सुरू केलेल्या मराठा सहाय्यक समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रकाश बालवडकर, केदार कदम, नाना वाळके, प्रकाश तापकीर, योगेश जुनवणे, मधुकर निम्हण, अजिंक्य सुतार, महेश सुतार, रणजीत कलापुरे, गिरीश जुनवणे, राहुल गायकवाड, जनार्दन मुरकुटे, संजय मुरकुटे, संग्राम मुरकुटे, जयेश मुरकुटे, योगेश सुतार, भरत जोरे, नारायण सुतार, हेरंब कलापुरे, छायाताई रणपिसे, शोभाताई वाघरळ, स्वाती रणपिसे, उज्वला जाधव, गणेश मोरे, गणेश सुतार, सागर सुतार, प्रल्हाद गोळे, सुरेश खेडेकर, संदीप सुतार आदी उपस्थित होते.

मराठा सहाय्यक समितीच्या माध्यमातून मराठा समाजासाठी कामांची माहिती यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या गावांमध्ये कोणती टाकले काढण्या साठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना देखील यावेळी जरंगे पाटील यांनी केल्या.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आपल्या समाजाची ताकद दाखवणे आवश्यक आहे. मराठा समाज जागृत झाला असून मराठा समाज एकत्र येऊन आपली भूमिका योग्य रीतीने दाखवून देईल. जून महिन्यामध्ये होणाऱ्या मराठा सभेसाठी सर्वांनी ताकतीने हजर राहावे.

See also  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० बाबत शेतकरी खातेदारांना आवाहन