महाळुंगे गावांमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्यातच उरकावे लागतात विधी यामुळे नातेवाईक त्रस्त

महाळुंगे : क्रीडानगरी महाळुंगे येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये गावातील विहिरीच्या पाण्याचा उपसा होत नसल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांना नाईलाज असतो अस्वच्छ पाण्यानेच सर्व विधी पार पाडावे लागत आहेत.

महाळुंगे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी दुर्लक्षित झाल्या आहेत. यामुळे नदीच्या कडेला असलेल्या विहिरींमध्ये दूषित पाणी जात असून यामुळे विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी निर्माण झाली आहे.

स्मशान भूमी परिसरात मधील विहिरीचा वापर करण्यात यावा तसेच उपसा चालू ठेवावा. स्मशानभूमी साठी स्वतंत्र बोअर तयार करून त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संतोष दादा मोहोळ यांनी केले आहे.

See also  वनव्यवस्थापनाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज- उपवनसंरक्षक महादेव मोहिते