भाजपा व अजित दादा गटाला आवाहन   ठरत आहे पिंपरी चिंचवड शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचे नेतृत्व

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित दादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या सोबत 28 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे अजित पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये मोठा धक्का बसला असून यामुळे पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे यांच्या धोरणात्मक निर्णय क्षमतेवर पक्षामध्ये शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकसभा निवडणुकी अगोदर मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या गटातून अजित पवार यांच्याकडे जाण्यास पिंपरी चिंचवड मधील अनेक महत्त्वपूर्ण राजकीय नेतृत्वांनी पसंती दर्शवली होती. दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी नेतृत्व स्वीकारले पक्ष बांधणीचा फारसा अनुभव नसताना देखील कार्यक्षमपणे शहरभर पक्षाची बांधणी करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्वतंत्र भव्य कार्यालय उभारून लोकसभेमध्ये प्रभावीपणे काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रभावी उभारणी कमी कालावधीत करण्याचा यशस्वी प्रयत्न तुषार कामठे यांनी केला.

वेगाने होत असलेली पिंपरी चिंचवड मधील शरद पवार गटाची बांधणी यामुळे तुषार कामठे यांचे देखील पक्षातील वजन वाढल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांचे प्रवेश भविष्यात शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये वाढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतील याला सातत्याने होत असलेल्या विविध पक्षातील प्रवेशाने दुजोरा मिळत आहे.

पक्ष बांधणीच्या जोरावर आगामी विधानसभा व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सातत्याने तुषार कामठे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नातून दिसत असले तरी भाजपाचे आवाहन मोडीत काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट व भाजपा यांच्या दुहेरी आव्हानाला सामोरे जात तुषार कामठे यांची बांधणी अधिक प्रभावी ठरत असली तरी ती मतदारांपर्यंत किती पोहोचणार व त्या माध्यमातून मतदारांना किती पसंत पडणार हे मात्र पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. तुषार कामठे यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला नव्या नेतृत्वाचा चेहरा मिळाला आहे हे मात्र राजकीय वर्तुळातील होत असलेल्या चर्चांमुळे मान्य करावे लागेल.

See also  डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार