पुणे जिल्हा परिषद, सिईओ रमेश चव्हाण यांची चंदन सोंडेकर यांच्या तक्रारीवरून उचलबांगडी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश चव्हाण, सीईओ पुणे जिल्हा परिषद यांच्या बदलीबाबत विभागीय आयुक्तांचे ग्रामविकास विभागास पत्र दिले आहे. याबाबत मा. प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चंदन सोंडेकर यांनी ईमेल द्वारे तक्रार दाखल केली होती.

पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण हे पुणे जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती.

त्यानुसार चंदन सोंडेकर यांनी ईमेल द्वारे पाच दिवसांपुर्वी पुन्हा निवडणूक आयोग व मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य याजकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी रमेश चव्हाण यांच्या बदलीचे आदेश काढले असुन त्यांच्या जागी संतोष पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद सिईओ यांची नियुक्त करण्यात आली आहे.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठिंबा, विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी