पुणे : पतीत पावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ,पुणे विभाग येथे निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे कार्यकर्त्यांनी पुणे विभाग नियंत्रक दिपक नेऊर यांची खुर्ची टेबलावर उलटी ठेऊन आपला राग व्यक्त केला. शेवटी निवेदन अश्विनी खेंगरे (कनिष्ठ अभियंता ) यांनी स्वीकारले.
यावेळी शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर ,शहर पालक मनोज नायर ,कार्याध्य्क्ष गोकुळ शेलार ,सुनील मराठे ,शरद देशमुख, निलेश जोशी, सौरभ कुलकर्णी, तेजस पाबळे,अक्षय बर्गे ,शुभम परदेशी ,दीपक परदेशी , विश्वास ननावरे, सलमान शेख, सिध्दार्थ लोखंडे,आदी अनेक जण उपस्थित होते.
























