हडपसर येथील दूषित पाणी येत असलेल्या परिसराची शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांची पाहणी

हडपसर : हडपसर गाडीतळ येथील जय भवानी नगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये गटाराचे पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेले काही आठवडे गाडीतळ परिसरातील वसाहती मध्ये दूषित पाणी येत आहे. यामुळे उलट्या जुलाब यांनी अनेक नागरिक आजारी पडले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात वारंवार तक्रार करून देखील याची योग्य दखल घेण्यात येत नाही.

अधिकारी योग्य उत्तरे देत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांनी नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतली व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी पाहणे करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली.

See also  जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा-पालकमंत्री