नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यतत्परता कोथरुड मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

पुणे : पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीला पूर आला. यामुळे नदी काठच्या असंख्य कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं लागलं.

कोथरुड मधील रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसराला ही पूराचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना तातडीने स्थलांतरित करण्याची आवश्यकता होती. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तातडीने नदी काठच्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन, त्यांची राहण्यासह जेवण आणि इतर आवश्यक वस्तूंची पुर्ताता करुन सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यतत्परतेवर कोथरुडची जनतेला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातील घाट माथ्यावर सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने ही सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडूनही मदत कार्य सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मदत कार्य करत आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

See also  किल्लेदार भाजी मार्केट सुसज्ज करा आमदार शिरोळे यांची सूचना