पुणे । दि.२७ : वडगावशेरी मधील आमदार स्वत:ला दमदार आमदार समजतो. कुणाच्या जीवावर निवडून आला. पोर्शे अपघातात मयताना मदत करण्याऐवजी बिल्डरांना मदत करत होता. पोलीस आयुक्तांनी देखील या आमदाराचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे हा कसला दमदार आमदार, हा तर दिवट्या आमदार असल्याचे मत राष्ट्रवादी कॅांग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी केले. ते खराडी येथे आयोजीत महानिर्धार मेळाव्यात बोलत होते.
यावेळी मंचावर शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार, जेष्ठ नेते अण्णासाहेब पठारे, जयदेव गायकवाड, प्रकाश म्हस्के, जगनाथ शेवाळे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, महादेव पठारे, भय्यासाहेब जाधव, संजिला पठारे, भिमराव गलांडे, आशिष माने, निता गलांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, पाउस आला तरी सभा होणार आणि करून दाखवली. मोदींना चारशे खासदार निवडून आणत संविधान बदलायचे होते. महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. देशात एक् निवडणूक घेण्याचे धोरण जाहीर केले होते मग का निवडणूका घेतल्या नाहीत. देशाला नेहरू, गांधी घरण्याचे योगदान आहे. देश स्वांतत्र्या साठी त्यांनी प्रयत्न केले. इंदिरा गांधींना पाकिस्तान घाबरले होते. अन् मोदी म्हणतात काय केले. है योग्य नाही.
शिंदे- फडणवीस राजवटीत काय केलें. हिंजवडी प्रमाणे खराडी आयटी बदलली आहे. रोजगार आम्ही उपलब्ध करून दिला. हिंजवडी, चाकण, खराडी बदलली आहे. राजंणगाव ला उद्योग आणले. आणि आताचे सताधारी काय करतात. कोयता गँग महणून पुणे शहर ओळखले जाते. पुण्यात व्यसने वाढली, नवीन पिढी उध्वस्त होईल अशी भीती वाटते. महिला सुरक्षित नाहीत असा आरोपही पवार यांनी केला.
ते म्हणाले, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे हे स्वताला दमदार आमदार म्हणतात. नाव काय तर टिंगरे यांचा आगोदर चा नेता कोण होता, चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणाऱ्याचा लोक बंदोबस्त करतील असेही ते म्हणाले.
प्रस्ताविकात सुरेंद्र पठारे म्हणाले,
राजकारनाचा डीएनए पठारे घराण्याचा आहे. साहेबा पुढे पहिले भाषण करण्याचे भाग्य मिळाले. माजी आमदार बापुसाहेब पठारे म्हणाले, आमदार असताना मतदार संघात विकास कामे केली. रोजगार मिळवून दिला. पुढील दहा वर्षाच्या काळात काही कामे झाली नाहीत. महापालिकेत सत्ता आणल्याशिवाय गप्प रहाणार नाहीं. राष्ट्रवादीच्या विचाराचा आमदार मतदार संघात येईल.
प्रशांत जगताप म्हणाले, वडगाव शेरी मतदार संघ महविकास आघाडी सरकारला निवडून देईल. मोदींच्या सभेसाठी चार कोटी खर्च केले पण ते पाण्यात गेले. पावसात सभा गाजवणारा नेता का निवड्याचां ते आपणं ठरवावे.
आमदार रोहीत पवार म्हणाले, पवार साहेबांच्या येणारा वाढदिवस ८५ वा आहे. त्यामुळे येत्या विधान सभेत ८५ आमदार निवडून आण्याचे आहेत. पुण्यात गुन्हे वाढले आहेत. सर्वात जास्त गुन्हेगारी सोबत ड्रग पुण्यात जास्त विकले जातात. भ्रष्टाचार वाढला आहे. पावसात पुणे तुंबलेले पुणे बघून मोदी थांबले. कोयता गँग वाढले आहेत. होम मिनिस्टर धोक्यात आहेत. त्यांना केंद्राने सुरक्षा पुरवली पाहीजेत. पुणे शहर वाहतूक कोंडी मध्ये सातव्या नंबर ला आहे. गुजरात ला कंपन्या नेल्या. रिंग रोड मध्ये भ्रष्टाचार केला आहे.
आभार आशिष माने यांनी मानले.
यांनी केला पक्ष प्रवेश:-
निलेश पवार, निखिल गायकवाड, धर्मराज वाझे, प्रकाश सातपुते, सुभाष काळभोर, हेमलता शिंदे, सोमनाथ साबळे, स्मिता सोंडे, सुनील खांदवे, प्रकाश सावंत, विशाल वाझे, प्रकाश सोनवणे, पोपट खांदवे, सुदर्शन चकाले, सोमनाथ मोझे, सुनील मोझें, राहुल प्रताप, सुजाता बुलाखे, तोसिफ शेख, संजीला पठारे, सुमन पठारे, किशोर विटकर, सुंनदा देवकर, तुषार खरात, सुलभा क्षीरसागर, जालिंदर कांबळे, नांनदा कांबळे, नानासाहेब आबणावे, राजेंद्र खांदवे, सोपान गलांडे,शिवाजी चांदरे, अजहर खान, सुप्रिया बूलाखे,साहिल शेख, राजेंद्र राजपुरोहित, विजय डफल, पपू गरुड, सुजाता ओहाळ, नाना नलावडे यांनी प्रवेश केला.