बालेवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचा मदतीचा हात

बालेवाडी : बालेवाडी येथे मुळा नदीच्या पुराचे पाणी घरामध्ये शिरलेल्या शंभरहून आले पूरग्रस्त नागरिकांना बालेवाडी शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे औषधांसहित मोफत दवाखाना शाळेमध्ये सुरू करण्यात आला आहे.

पूरग्रस्त नागरिकांना बालेवाडी येथील बालवडकर शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून या नागरिकांना विविध समाजाच्या स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. बाणेर बालेवाडी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना सहकार्य बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या टीमच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

पूरग्रस्त नागरिक जोपर्यंत या परिसरात वास्तव्यास आहेत तोपर्यंत या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था राहणार असून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे असे डॉक्टर राजेश देशपांडे यांनी सांगितले.

डॉक्टर नाखरे, डॉक्टर सागर सुपेकर, डॉक्टर बबन साळवे, डॉक्टर कविता चौधरी, डॉक्टर प्रिया देशपांडे तसेच बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे सहकार्य लाभले असून नाकोडा मेडिकल्सच्या वतीने  विशेष सहकार्य करण्यात आले आहे.

See also  फुलोरा फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न