एन एस यु आय चे अध्यक्ष अभिजीत गोरे यांचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना निवेदन

पुणे : पुणे जिल्हा एन. एस.यु.आयचे अध्यक्ष अभिजित गोरे यांनी बार्टी येते महासंचालक सुनील वारे यांची भेट घेऊन यु.प.एस.सी. बार्टीची सामायिक परीक्षा व तलाठी भरती या दोन्ही एकत्रित येत असल्याच्या कारणास्तव काही विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो त्यामुळे पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख यांनी भेट घेऊन यासंबंधी निवेदन दिले व महासंचालकांनी याच्यावरती तोडगा काढू असं आश्वासन दिलेल आहे.

यावेळी पुणे जिल्हा एन. एस.यू.आय.चे अध्यक्ष अभिजीत गोरे यांच्या समवेत रविराज कांबळे, आदिद्य वगरे, जयदीप सूर्यवंशी उपस्थित होते.

तसेच सारथीच्या धरतीवरती बार्टीच्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये साह्य निधी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळेस महासंचालक सुनील वारे यांनी याच्यावरती सुद्धा लवकरच निर्णय घेऊ आणि तो लवकरच अमलात आणला जाईल असे आश्वासन दिलेल आहे.

See also  'अडॉप्ट अ स्कूल’ हा निर्णय शाळांच्या विकासासाठीच- शिक्षणमंत्री