उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून  बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

पुणे, दि. २६ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण असून पुणे महापालिकेने  सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

यावेळी  सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, शहरातील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागात नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात पुरपरिस्थिती टाळण्याकरीता  पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविण्याबाबत सर्वेक्षण करावे. या कामी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, श्री. पाटील म्हणाले.

See also  कोकाटे तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2023 बक्षीस समारंभ संपन्न