पाषाण : पाषाण सुतारवाडी परिसरातील अनेक नागरिक सार्वजनिक स्वच्छते संदर्भात तक्रारी घेऊन नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्याकडे आले असता परिसरातील सर्व नागरिक व पाषाण सुतारवाडी भागाचे आरोग्य निरीक्षक यांच्या समवेत आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित केलेली होती.
यावेळी नागरिकांनी रस्त्यांची स्वच्छता, दैनंदिन कचरा उचलणे, तसेच कचरा विलगणिकरण स्पाॅटचे स्वच्छता याविषयीच्या अनेक समस्या नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या पुढील मांडल्या. स्वच्छता कर्मचारी व स्वच्छ संस्था यांच्यामार्फत नागरिकांनी मांडलेल्या सूचना आणि पुणे मनपाचे नियोजन या दोघांच्या सहकार्याने आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल आणि नागरिकांच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल. या संदर्भातील सूचना नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी प्रशासनाला केल्या यावेळी पुणे शहर भाजपा महा उपाध्यक्ष राहुल दादा कोकाटे,भगवानतात्या निम्हण, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, उत्तम जाधव, नवनाथ ववले, आरोग्य निरीक्षक शिवाजी गायकवाड, सनी कांबळे,आनंद कांबळे, संतोष शेंडगे, स्वच्छ संस्थेच्या संध्या ढमाले,किरण सरोदे,मनोज पाटील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
























