सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

खडकवासला: शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पूर रेषा आणि नदीपात्राबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही शेवटी लोकांच्या जीवीताशी  निगडित प्रश्न असल्याने  महानगरपालिकेच्या  नियोजन आणि अतिक्रमण विभागाला सूचना देण्यात येतील. पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांचे पाणी   खडकवासला धरणात येत असल्यामुळे मुठा  नदीपात्रातून पाणी सोडणे अपरिहार्य आहे असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


२५ जुलै आणि दोन दिवसांपासून  खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे सिंहगड रोड परिसरातील एकता नगर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी एकता नगर येथील परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आपत्ती व्यवस्थापनाची पाहणी केल्यानंतर
मुख्यमंत्री  शिंदे यांनी आज सोमवारी  खडकवासला धरणाच्या भिंतीवर जाऊन खडकवासला धरण परिसराची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत  पाहणी केली पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्य  मंत्री तानाजी सावंत,, आमदार भीमराव तापकीर पीएमआरडीएचे संचालक रमेश कोंडे,  जिल्हाधिकारी सुहास दिवसे, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाल, पुणे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, खडकवासला  पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे उपस्थित होते.


मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले  पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे
खडकवासला धरण पाहणी करायला आलो आहे. धरण परिसरात  पाऊस कमी असला तरी वर तीन मोठी धरणे आहेत. त्या धरणातून येणारे पाणी खडकवासला धरणात येत असल्यामुळे  खडकवासला धरणावर जास्तीचे पाणी सोडणे अपरिहार्य असते, ही कसरत असून नाही पाणी सोडलं तर धरणाला धोका होऊ शकतो. पूर रेषे बाबत आणि नदीपात्राबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही शेवटी लोकांच्या जीवित अशी निगडित प्रश्न आहे. ते पुढे म्हणाले, पुराच्या पाण्यामुळे लोकांना त्रास होऊ नये. यासाठी सर्व पाटबंधारे विभागाची आणि पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची टीम समन्वय ठेवून काम करत आहे. त्यामुळे आता सगळं नियंत्रित आहे. सर्व पावसाळा व्यवस्थित जावा लोकांना त्रास होऊ नये त्यामुळे पाटबंधारे विभाग धरणातून  पाणी सोडणे नियोजन करत असून समन्वय ठेवून अधिकारी काम करत आहेत.

पुढील काळात पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी

नदीपात्राची साठवण क्षमता  वाढवणेसाठी  पूररेषा निश्चित करून अतिक्रमण आणि पात्रातला राडारोडा काढण्याची आवश्यकता आहे. त्यातच खोलीकरण आणि रुंदीकरण केलं तर  नदीची वहनक्षमता  क्षमता वाढेल.

See also  कोथरूड गावठाण गुजरात कॉलनीत चंद्रकांतदादांना उत्स्फूर्त प्रतिसाद! भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचाही सहभाग