पिंपरी : राष्ट्रवादीतील एक मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये समाविष्ट झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये देखील फार मोठे बदल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार पक्षात राहिलेल्या प्रमुख पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांची शहर कार्यकारी समिती करणारे असून या समितीमध्ये नऊ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, इमरान शेख, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर, शीलाताई भोंडवे यांचा पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शहरातील पक्ष संघटना मजबूत करणे तसेच वाढवण्याच्या दृष्टीकोणातून या कार्यकारी समितीची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली.
यामुळे तरुण नेतृत्वांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड ची राष्ट्रवादीची नव्याने बांधणी होणार असल्याचे दिसून येत आहे. खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तरुणांना संधी देण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने पिंपरी चिंचवड शहराची देखील बांधणी नव्या नेतृत्वांच्या हातात दिली जाणार आहे ही बाब स्पष्ट होत आहे.
सुनील गव्हाणे म्हणाले, पक्षाने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करून दाखवू. त्यासाठी सर्वतीपरी कष्ट करण्याची आमची तयारी आहे पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या विचार प्रवाहात अधिकारी लोक सामावून घेत आम्ही पक्ष ताकतीने उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.