बाणेर बालेवाडीत स्मार्ट सिटी ने लावलेल्या विद्युत पोल पासून सावधान असे बोर्ड लावण्याची नागरिकांवर वेळ

पुणे : वीरभद्र नगर येथे शॉक लागून एक गाय मृत्युमुखी पडली. सदर पोल हा स्मार्ट सिटीच्या  अखत्यारीत येतो. काही आठवड्यापूर्वी बालेवाडी येथे एक महिला शॉक लागून मृत्युमुखी पडली होती. यानंतर नागरिकांनी आंदोलने केली होती.

परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली निकृष्ट कामे यांची जबाबदारी स्मार्ट सिटी घेत नाही. असे असताना देखील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. पुणे महानगरपालिका आपली जबाबदारी झटकताना सातत्याने दिसत असून देखील प्रशासन मात्र ढिम्म झाले आहे.

सातत्याने होत असलेल्या दुर्घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील योग्य उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्मार्ट सिटी ने लावलेल्या पोल पासून सावधान असे बोर्ड लावण्याची वेळ आली आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये सातत्याने या घटना होत असून देखील या घटनांची फारशी गांभीर्याने दखल प्रशासन घेत नाही. अनेक ठिकाणी सुतारवाडी पाषाण बाणेर बालेवाडी परिसरामध्ये भूमी अंतर्गत केबलची कामे देखील झालेली नाहीत. याबाबत कोथरूड मतदार संघाचे आमदार म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरून लागली आहे.

See also  डोणजे गावात बैलगाडीतून गुलालाची उधळण करत सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष