सुस गावठाण अंतर्गत खड्डे बुजवण्याचे काम सुरू माजी उपसरपंच अनिकेत उत्तम चांदेरे यांच्या पाठपुराव्याला यश

सुस : सुस गावठाण अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम माजी उपसरपंच अनिकेत उत्तम चांदेरे यांच्या पाठपुराव्यानुसार  सुरू करण्यात आले.

सुस परिसरातील सुस गावठाण येथील कैलास वर्मा ज्वेलर्स, ठकसेन नगर, आणि सुस-नांदे (सनी वर्ल्ड) रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सुसगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी मध्ये भर पडत होती. तसेच नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत होता.

गावठाण परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे काही प्रमाणात मुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास देखील मदत होणार आहे.

See also  छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विकासकामे मार्गी लावण्यासंदर्भात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट