लोहियानगर भागातील भगवान मार्कंडे महामुनी पथ या नावाचे नाम फलकाची त्वरित लावावे पुणे शहर पद्मशाली समाजाची मागणी

पुणे : लोहियानगर महात्माफुले गंज पेठ भागातील भगवान मार्कंडे महामुनी पथ या नावाचे नामफलकाची त्वरित लावण्याची मागणी पुणे शहर पद्मशाली समाजाच्या वतीने समाजाचे कार्यकर्ता गणेश शेरला यांच्या वतीने पुणे महानगरपालिका भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयचे उप अभियंता वासुदेव कुरबेट यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले.


पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त भगवान मार्कंडे महामुनी यांचे रथोत्सव मोठ्या उत्साहात गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, येथील मार्कंडे मंदिरापाशी समारोप होतो. या रथोत्सव मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित असतात सदर ठिकाणी भगवान मार्कंडेय महामुनी यांचे नावाचे फलक उभारण्यात यावे व रथ मिरवणुक रस्त्यावर खड्डे त्वरित बुजवण्यात यावे व स्वच्छा ठेवावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला, ज्ञानेश्वर काडगी, सुनील जाना, बद्रीनाथ जन्नु आदी यावेळी उपस्थित होते.

See also  राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे (PSP) अपारंपारीक ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस