योगीराज पतसंस्थेच्या बाणेर शाखेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा

बाणेर : योगीराज पतसंस्थेत लक्ष्मी पूजना निमित्त संस्थेचे सन्मानीय सभासद प्रमोदजी बेलसरे व कर्तृत्वान माहिला चपराक प्रकाशनाच्या उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्या शुभहस्ते तिजोरी पूजन  व आरती करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या औचित्यानिमित्याने योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजनेअंतर्गत कु.शितल महादेव साळवणे या मुलीला  संसारपयोगी भांड्याचा सेट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेत कर्तृत्वान महिलांच्या हस्ते तिजोरी पूजनाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्था करत असलेल्या आर्थिक व सामाजिक कामात करत असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. संस्थेच्या यशात संस्थेचे ठेवीदार, सभासद, संचालक मोलाचा सहभाग असतो. संस्था विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम अविरतपणे करत आहे. तसेच लक्ष्मी पूजन निमित्त संस्थेत 2 कोटी 7 लाख रूपयांची ठेव सभासदांनी ठेवली . आणि गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत संस्थेच्या ठेवी मध्ये तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे याचा आवर्जून उल्लेख केला.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. वझरकर, स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंधचे अध्यक्ष श्रीकांत पाटील,  संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे ,संचालक सचिन चव्हाण, सौ रंजना कोलते ,संस्थेचे आजीव सदस्य वसंतराव माळी,अशोकराव रानवडे,अमर लोंढे , तसेच मृदंगमणी पांडुरंग अप्पा दातार, दै. सकाळचे वार्ताहार बाबा तारे, दै. लोकमतचे वार्ताहार रामदास दातार, प्रल्हाद मुरकुटे, रवींद्र दर्शने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके व संस्थेचा स्टाफ दै. प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. आभार संचालिका रंजना कोलते यांनी मानले.

See also  ‘कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगार_क्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भुमिका - काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी