औंध : रोहन निलय१ हाऊसिंग सोसायटीमध्ये उत्साह मध्ये गणरायाचे स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठा होऊन त्यानंतर आरती करण्यात आली.
मॅनेजिंग कमिटीच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. गणेश उत्सवानिमित्त सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सौरभ मिश्रा यांचे बासरी वादन हृदयाला भिडणारे होते.रफिक नागरजी आणि रंगाजी यांनी देवा हो देवा हे भक्तीगीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
चैताली माजगावकर भंडारी यांचा ‘खेळ बाहुल्यांचा’ मनोरंजक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
सोसायटीतील गणपती पाच दिवसांचा असतो. हे पाचही दिवस मनोरंजन आणि प्रबोधन पर कार्यक्रमांनी भारलेले असतात अशी माहिती अरुणा कळसकर यांनी दिली.