मोरेवस्ती- म्हेत्रेवस्ती- नेवाळे वस्ती चिखली परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात कारवाई करण्याची मागणी स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली

चिखली :- मोरेवस्ती- म्हेत्रेवस्ती- नेवाळे वस्ती व आजूबाजूच्या परिसरात चिखली  या भागात होणाऱ्या सतत चोऱ्या व घरफोडी,मारामऱ्या व वाढत असलेल्या गुन्हेगारी या संदर्भातील आरोपीना तत्काळ अटक करून कडक कायदेशीर  कारवाई करण्याचे मागणी स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली.

रात्री दिनांक 9/8/2024 रोजी रात्रीच्या च्या वेळेस म्हेत्रे वस्ती, मोरे वस्ती ,नेवाळे वस्ती चिखली भागात काही अज्ञात इसमानी रात्री 2 ते 4 या वेळेत काही मेडिकल,दवाखाने,किराणा दुकान,लॅब, प्रेस प्रिंटिंग वैगेरे असा छोट्या मोठ्या व्यापारांचे चोरट्या कडून शट्टर उचकटून दुकानदारांचे रोख रक्कम व माल इत्यादी सह मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आले. 

यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असेल पोलिसांनी गुन्हेगारी वर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी यावेळी स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवडचे स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी विजय जरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

See also  सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार