पौड : मावळ व मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील नागरी समस्या व प्रश्न हातात घेऊन पक्ष संघटनेला संजीवनी प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील, जेष्ठ नेते कमलाकर सातव, प्रदेश प्रतिनिधी आकाश मोरे, शंकरराव दांगट, संदीप नायकरे, चंद्रकांत गोरे, संजय अभंग ,आनंद पवार, मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, संपर्क प्रमुख राजू शिंदे, उपाध्यक्ष राजीव फलके, मुळशी तालुकाध्यक्ष सुरेश पारखी, उपाध्यक्ष सतीश चांदेरे, अशोक मातेरे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार लोकशाही टिकवण्यासाठी या निवडणुकीत सामोरे गेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत लढलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष सदैव पाठीशी राहील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

























