औंध येथील विनापरवाना रस्ता खोदाई करून विद्युत केबल टाकणाऱ्यांना तीन पट दंडाची कारवाई 41लाखांचा दंड

औंध : नागरस रोड (भाले चौक) औंध येथे विनापरवाना 114 मीटर रस्ते खोदाई करून विद्युत केबल टाकण्यात आली होती. हा सर्व प्रकार 7 मे 2023 रोजी घडला आणि या संदर्भातील माहिती पथ विभागाचे वरिष्ठ अभियंता विजय कुलकर्णी यांना व्हाट्सअप द्वारे संबंधित प्रकाराचे फोटो पाठवून तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार त्यांनी तातडीने पुणे महानगरपालिकेने आपला प्रतिनिधी पाठवून संबंधित ठिकाणचा स्थळ पाहणी करून विनापरवाना रस्तेखोदाई करणाऱ्यांना नोटीस देऊन दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते. याबाबत रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी पुणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती.
तक्रारीचे दखल घेत पुणे महानगरपालिकेने ठेकेदार सेक्विया रियालिटी कंपनीचे अजय अग्रवाल यांच्यावर कारवाई करत 4169664 रुपये दंड आकारला आहे.
याबाबत पुणे बुलेटीनच्या माध्यमातून बातमी सर्वप्रथम प्रसारित करण्यात आली होती.

See also  आम आदमी रिक्षा आणि इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य ) प्रथम स्नेहमेळावा