जयेश संजय मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी परिसरामध्ये एक तरुण तडफदार युवा पिढीचे नेतृत्व उभारून येत आहे :- खासदार सुप्रिया ताई सुळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद चंद्र पवार ) जयेश संजय मुरकुटे यांनी अतिशय सुंदर असे कार्यालय उभारले आहे हे नागरिकांसाठी एक हक्काचे समस्या निवारण केंद्र आहे. नागरिकांनी या ठिकाणी हक्काने यावे, नागरिकांसाठी जयेश संजय मुरकुटे हे सदैव  या ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहेत. जयेश मुरकुटे हे तुमच्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहेत. जयेश संजय मुरकुटे यांच्या माध्यमातून एक तरुण तडफदार युवा पिढीचे नेतृत्व बाणेर बालेवाडी परिसरामध्ये उभारून येत आहे. आपली जी काही समाजामध्ये ओळख निर्माण होते ती आपल्या परिसरातील जनतेमुळेच आपली प्रतिमा तयार होते. तुम्हाला जर सामाजिक आयुष्यामध्ये मोठे व्हायचे असेल तर 80 टक्के समाजकारण करा व 20 टक्के राजकारण करा असा सल्ला सुप्रिया ताई सुळे यांनी दिला.

बाणेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष  जयेश संजय मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे बोलत होत्या.

यावेळेस सुप्रियाताई सुळे यांनी बदलापूर येथे बाल लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच आरोपीला  फाशीची शिक्षा देण्यात यावे अशी सरकारकडे मागणी केली. 

यावेळी बोलताना कोथरूड मतदारसंघ कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जयेश संजय मुरकुटे म्हणाले,  हे जनसंपर्क कार्यालय हे नागरिकांसाठी रोज चालू असेल नागरिकांनी हक्काने या ठिकाणी यावे व आपल्या घरातलाच माणूस समजून आम्हास समस्या सांगाव्यात आम्ही सर्वतोपरी त्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप महिला शहर अध्यक्ष स्वाती पोकळे, स्वप्नील दुधाने, अभिनव शिक्षक प्रसारक मंडळाचे अशोक मुरकुटे,  माजी नगरसेविका रंजनाताई मुरकुटे, रवीकांत वर्पे, गणपत मुरकुटे , राजेश विधाते, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे खजिनदार राहुल धनकुडे , अमर लोंढे,गणेश तापकीर, भगवान तात्या मुरकुटे , भानुदास मुरकुटे,हरिभाऊ धनकुडे, सुधाकर धनकुडे, प्रल्हाद मुरकुटे, महेश सुतार, योगेश सुतार, बबनराव दांगट, जनार्धन मुरकुटे, गणेश विधाते, राजेंद्र मुरकुटे, गणेश मुरकुटे, बबलू मुरकुटे , अजय निम्हण, अंकुश पाडाळे, नारायण चांदेरे, बजरंग चांदेकर, बन्सीअण्णा मुरकुटे, अर्जुनसागर मुरकुटे , राजेंद्र ताम्हाणे, अॅड आशिष ताम्हाणे, सुनिल कडूसकर, नवनाथ मुरकुटे तसेच परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! - ना. चंद्रकांत पाटील