बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन राष्ट्रीय कार्यकारणीवर निवड

पुणे  :  बाणेर येथे सदानंद हॉटेल यांच्या सभागृहात पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या वतीने आपल्या पुण्यातील प्रसन्न ट्रॅव्हल्स चे मालक प्रसन्न पटवर्धन यांची  बस अँड कारऑपरेटर कॉन्फिडेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी फेर नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी श्री किरण दादा देसाई यांची राष्ट्रीय कार्यकारणीवर वेस्ट झोन च्या व्हॉइस प्रेसिडेंट पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे.


या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ राज्याचे माजी अप्पर परिवहन आयुक्त श्री जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री राजन जुनवणे, श्री दत्तात्रेय भेगडे, श्री भालचंद्र बोराडे, श्री दीपक कलापुरे, श्री तुषार जगताप व इतर बरेच पदाधिकारी उपस्थित होते.

See also  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी - खा. रजनीताई पाटील केंद्रीय