बाणेर मध्ये सिंधुदुर्ग राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन

बाणेर : बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने राजकोट येथील पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष कोथरूड विधानसभा स्वप्निल दुधाने, कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे,गिरीश गुरनानी अध्यक्ष युवक कोथरूड विधानसभा,ज्योती सूर्यवंशी , मनीषा भोसल, मीनल सुरवा, सचिन यादव, अमित भगत, महेश कणेरकर , किशोर शेडगे, सतीश अंभुरे योगिता साबळे आदी उपस्थित होते.

यावेळी आंदोलन करताना राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांमध्ये होत असलेला हलगर्जीपणा तसेच करण्यात आलेला भ्रष्टाचार याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच पळून गेलेल्या आरोपींचा तपास करून तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे. सरकारच्या भ्रष्टाचारामध्ये सामील आरोपी फरार होत असून कारवाई करण्यासाठी गृहमंत्रालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी सांगितले.

See also  खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा