बोपोडी : बोपोडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन समाजातील लोक एकत्र येत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसून आले.
कार्यक्रमास प्रामुख्याने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी नागसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, माजी नगरसेवक नंदलाल धीवर, ज्ञानेश्वर मुरकुटे (माजी अध्यक्ष पीएमटी), राजेंद्र भूतडा , ॲड. रमेश पवळे, विनोद रणपिसे, अनिल भिसे, विशाल जाधव,अनवर शेख उपस्थित होते.
तसेच करिम शेख, अमित जावीर, विजय जाधव, शशिकांत पांडुळे, प्रशांत टेके, इंद्रजित भालेराव, रविंद्र गायकवाड, पोपट खंडागळे, दत्तात्रय सूर्यवंशी, दादासाहेब रणपिसे, रोहित भिसे, केतन गायकवाड, गणेश सारवान, विकास कांबळे, निलेश मोरे, अजित थेरे, आदित्य ओव्हाळ, कुशल घागट, विठ्ठल आरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय अशोक गायकवाड, जीवन घोंगडे, सुरेश ससाणे, काका लगड, भरत शेळके, राजू सिंग, राजू पिल्लं, कुणाल जाधव, रोहित परदेशी, शैलेंद्र पवार, विजय ढोणे, शिवाजी आंग्रे, जय चव्हाण, संदीप भिसे, अमोल जाधव, निलेश रूपंटक्के, मयुरेश गायकवाड, बाबा तांबोळी, अनिकेत भिसे, चेतन भुतडा, अकील मोगल यांनीही उपस्थिती लावली.
महिलांमध्ये मनिषा ओव्हाळ, अंजली दिघे, ज्योती परदेशी, सुंदर ओव्हाळ, रेश्मा कांबळे, अख्तरी शेख, भाग्यश्री गाढवे, ज्योती भिसे, शेंवता नाटेकर, दिलशाद अत्तर, फरिदा शेख, तृप्ती घोडके, रविंद्र कांबळे आणि मुस्कान अत्तर सहभागी झाल्या.
धार्मिक प्रतिनिधींमध्ये मौलाना, बौद्धाचार्य, फादर व इतर धर्मगुरू उपस्थित होते. तसेच सुनील टकावणे, श्रीधर गायकवाड, विनोद मुरार, अफजल शेख आणि बाळासाहेब रानवडे यांनीही शोकसभेत सहभाग घेतला.
यावेळी ॲड. निलेश निकम यांनी आपल्या भाषणात एक हृदयस्पर्शी अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, गटनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ते दररोज रात्री आठ वाजता अजित पवार यांच्याशी फोनवर संवाद साधत असत. मात्र एका दिवशी कामाच्या व्यापामुळे फोन होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजित पवार यांचा मोबाईल सतत स्विच ऑफ येत होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक वेळा फोन करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना अजित पवार यांच्या हवाई प्रवासादरम्यान अपघात झाल्याची व त्यात त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली.
ही आठवण सांगताना ॲड. निलेश निकम भावुक झाले आणि सभास्थळी उपस्थित अनेक नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही काळ संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. या सर्वपक्षीय शोकसभेमधून अजित पवार हे केवळ एका पक्षाचे नेते नसून सर्व समाजाचे लोकनेते होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.























