पुणे, दि. २९: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व चॉईस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गोळीबार मैदान-सेवन लव्ह चौक ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ यादरम्यान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, अली दारुवाला, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर आसी, पूना महाविद्यालय व परिसरातील २० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास १ हजार खेळाडू व क्रीडाप्रेमींनी सहभाग घेतला.
यावेळी श्री. कसगावडे यांनी मार्गदर्शन केले. या फेरीत मोलेदिना माध्यमिक शाळा, माउंट कार्मेल माध्यमिक शाळा, क्रिसेंट हायस्कूल, एस.एम. जोशी हिंदी माध्यमिक शाळा, अंजुमन ए इस्लाम माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले हायस्कूल, लेडी हवाबाई माध्यमिक शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड, झांज, लेझीम पथक व क्रीडाविषयक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षक विल्सन अॅन्ड्रयूज, महादेव माने, दत्तात्रय हेगडकर, तानाजी पाटील, भाऊसाहेब महाडीक, प्रा. राज मुजावर, शिवाजी कामथे, अनिल टिंगरे, रुबिना खान, नजीब मुन्शी, स्वाती बेने, मार्गारेट समुद्रे, जयराम पारधी, फराह मुस्तफी, आनंद भिकुले, ओमीराम चौधरी, आफ्रिन पठाण, सचिन दुर्गाडे, मुख्तार शेख यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तर स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती, ध्रुव ग्लोबल स्कूल, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, श्री श्री रवीशंकर विद्यालय भुकुम, हचिंग्ज हायस्कूल तळेगांव, संस्कृती स्कूल आदी शाळांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.