पुणे : पेठ खराडी स.न.67/2 येथिल Yashwin Orizzonte या बांधकामास मे विलास जावडेकर डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामास विद्युत पुरवठा करण्यासाठी रस्ते खोदाई करून विद्युत केबल टाकली.रयत स्वाभिमानी संघटनेने तक्रार केल्यानंतर पुणे मनपाचा पथ विभागाने सदर ठिकाणची पाहणी करून सदर बांधकाम व्यावसायिकास 31089600₹ (तीन कोटी दहा लाख एकोन्नवद हजार सहाशे रूपये ) करण्यात आला आहे.
विनापरवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल 850 मी टाकण्यात आली.पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असे आदेश काढले होते की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून कोणतेही काम केले जाणार नाही असे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्ट आदेश असताना देखील खराडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केल्यामुळे त्यास आकारलेला दंड 31089600₹ (तीन कोटी दहा लाख एकोन्नवद हजार सहाशे रूपये) आहे या बांधकाम व्यावसायिकाची कृती ही मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी आहे.
या व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे दंड लवकरात लवकर वसुल करावा अन्यथा या ठिकाणी चालू असलेल्या बांधकामास तात्काळ Work Stop Notice देणेत यावी व त्यानंतर सदर बांधकाम व्यावसायिकांनी दंड रक्कम मनपा कोषागारात जमा केल्याशिवाय Work Stop Notice नोटीस निरस्त करू नये अशी आमची मागणी आहे असे रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी सांगितले.