बाणेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्वच्छ भारत अभियान अन्वये दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सोपानराव कटके शाळा पॅनकार्ड रस्ता ते मुरकुटे उद्यान बाणेर याठिकाणी सूक्ष्म/खोलवर स्वच्छता (Deep Clen Drive) अभियान आयोजित करण्यात आले होते.
मसंदिप कदम उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन, अविनाश सकपाळ उपआयुक्त परिमंडळ क्र.२, मा. गिरीष दापकेकर महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा/आरोग्य विभाग, (स्थापत्य/बांधकाम/ड्रेनेज/पथ/विद्युत) अभियंता विभाग, आकाशचिन्ह, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग यातील सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या डीप क्लिनिंग अभियानामध्ये माजी खासदार सौ. वंदना चव्हाण व पॅनकार्ड क्लब रेसिडेन्सी फोरम्स चे श्री. अरविंद गिद्रोनिया व स्थानिक नागरिक हेदेखील प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.
श्री. विजय भोईर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य निरीक्षक/मोकादम/सफाई सेवक यांनी संपूर्ण रस्त्याची सूक्ष्म/खोल स्वच्छता करून अस्वच्छता करणाऱ्या २४ व्यक्ती/दुकाने यांचेवर कारवाई करून रक्कम रु. २३२००/- दंड वसूल केला. त्याचप्रमाणे बांधकाम विभाग श्री. अजित सणस व अतिक्रमण विभाग श्री. नरुले यांच्या संयुक्तपणे ५९ अनधिकृत बांधकाम/दुकाने/पथारी/हातगाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली. विद्युत विभाग श्री. दत्ता लाळगे अभियंता यांच्या नियंत्रणाखाली १२५०० मीटर अनधिकृत इंटरनेट केबल व रस्त्यावर पडलेले विद्युत उचलून घेण्यात आले. तसेच उद्यान विभाग मार्फत श्री. साबळे यांच्या नियंत्रणाखाली २० वृक्षाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या तोडण्यात आल्या. या डीप क्लिनिंग अभियानच्या शेवटी सर्वानी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाची सांगता केली.
