कोकाटे तालिम मंडळाचावतीने चित्रकला स्पर्धा

पाषाण  : गणेशोत्सवानिमित्त कोकाटे तालिम मंडळ व पाषाण भाजपा यांचा वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन पाषाण सुस रोड येथील अभिनव कला महाविद्यालयात करण्यात आले होते.पाषाण परिसरातील ४०० मुलांनी स्पर्धेत भाग घेतला.


भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष श्री  राहुल कोकाटे व भाजपा नेत्या सौ मयुरीताई कोकाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
राष्ट्रपती पदक विजेत्या,NIV चा शास्त्रज्ञ व COVID19 लस संशोधनात मोलाची भुमिका बजावणाऱ्या डॉ प्रज्ञा यादव यांचा शुभःस्ते विजेत्या मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले.
मुलांनी अभ्यासबरोबर कला व मैदानी खेळांवर भर दिला पाहिजे असे डॉ प्रज्ञा यादव यांनी सांगितले तर पाषाण परिसराचे कला व सांस्कृतिक वातावरण वाढीसाठी आशा स्पर्धा आयोजनासाठी नागरिकांनी आशा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशी विनंती श्री राहुल कोकाटे यांनी केली.


  अभिनव कला महविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय भारती,लोकसेवा स्कुलचा समन्वयक सौ दीपली गजभिये,श्री रत्नाकर माणकर,श्री सुनील भाले,श्री सुकुमार बडवे,श्री नितीन कोकाटे,या वेळी उपस्थित होते.श्री गिरीश चोक,श्री किशोर मोरे,श्री अमोल पाटिल, श्री उत्तम जाधव,श्री विकास पाटिल,श्री विष्णु धुमाळे यांनी या कार्यकारमाचे यक्षस्वी नियोजन केले.

See also  ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील