औंध सानेवाडी येथील सेलवण हाइट सोसायटीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

औंध : औंध सानेवाडी येथील सेलवान हाइट्स सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गणेशोत्सव निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सोसायटी मधील नागरिकांसाठी टेबल टेनिस पूल गेम कॅरम स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अथर्वशीर्ष पठण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सेलवान हिरकणी च्या वतीने लाठीकाठी चे आयोजन करण्यात आले होते.

सोसायटीचे अध्यक्ष सुधीर परांजपे, सेक्रेटरी राजीव कथुरिया, सांस्कृतिक समितीचे संदीप पाटील, प्रेम मेनन, शेखर पोदार सुजाता पाटील आदी उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथील मनपा शाळेला अमोल बालवडकर फाउंडेशनच्या प्रयत्नातून पाच लॅपटॉप वर तीन कम्प्युटरचे वाटप