सुतारवाडी पाषाण येथील थरकुडे चाळ येथील पाण्याचा गंभीर प्रश्न शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पाठपुरावा करून सोडवला

पाषाण : सुतारवाडी, पाषाण येथील थरकुडे चाळ येथील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न  शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्यानंतर सोडवण्यात यश आले असून नवीन जलवाही टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

नवीन जल वाहिनीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी संतोष तोंडे ( विभागप्रमुख ), स्वातीताई रणपिसे (विभाग संघटिका) दिनेश नाथ( उपविभाग प्रमुख), ऋषिकेश कुलकर्णी (प्रभाग प्रमुख) सुनिता रानवडे (शाखा संघटिका) अजिंक्य सुतार ( शाखाप्रमुख ), अमोल फाले ( शाखाप्रमुख ),महेश सुतार ( शिवदूत ), अमित रणपिसे (युवा सेना अधिकारी), रूपालीताई सुतार आदी उपस्थित होते.

See also  संगमवाडी गावातील स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात यावे; मनसेची मागणी