भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार , नागरिकांना लाडू वाटप व बाल मेळावा आयोजन

औंध: डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे व ॲड डॉ मधुकर मुसळे यांच्या हस्ते औंध येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.

यानिमित्त ॲड मधुकर मुसळे व नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या सहकार्याने व भाजपा युवा कार्यकर्ते श्री मिलिंद कदम आयोजित बाळ गोपाळ मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रकाश बालवडकर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

याप्रसंगी श्री मिलिंद कदम,श्री महेश जाधव,श्री अमोल ढवारे,श्री अविनाश कांबळे, श्री द्रोणाचार्य शिंदे,श्री अशोक ठोसर, भाई शेख,श्री ईश्वर ठोसर, श्री प्रशांत शिंदे, श्री सतीश बतासे, श्री गणेश सरोदे ,श्री लोकेश गुरव, श्री सतीश निरवणे, श्री दत्ता कांबळे, श्री जयराम ननवरे इत्यादी जण उपस्थित होते

See also  बहुमानाची मानाची ६५ व्या महाराष्ट्र केसरी किताबाची गदा धाराशिवकडे रवाना